जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर यांनी जैवतंत्रज्ञान विभाग (DBT),भारत सरकार यांच्या स्टार कॉलेज योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रस्ताव सादर केलेला होता.त्यानुसार जैवतंत्रज्ञान विभागामार्फत महाविद्यालयास या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पुढील तीन वर्षांसाठी रक्कम रु. १,२४,२९,७०४.००/- (रक्कम रुपये एक कोटी चोवीस लाख एकोणतीस हजार सातशे चार) अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

या अनुदानाचा उपयोग विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र,प्राणीशास्त्र,वनस्पतीशास्त्र व पदार्थ विज्ञान या विभागांना व महविद्यालयातील विद्यार्थ्याना होणार आहे. हे अनुदान विज्ञान शाखेतील विविध विभागांसाठी शैक्षणिक उपकरणे खरेदी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत गुणवत्ता विकास,शैक्षणिक व औद्योगिक सहली,तज्ञांची व्याख्याने,संशोधन प्रकल्प, औद्योगिक प्रशिक्षण इत्यादी साठी मिळणार आहे. तसेच या अनुदानातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवता येणार आहेत.विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमा बाहेरील मुद्यांसंदर्भात जसे पर्यावरण संरक्षण, बौद्धिक संपदा अधिकार,इत्यादि बाबत विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणार आहे.तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्यासाठी विज्ञान प्रसार संदर्भात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

सदर प्रस्ताव सादर करण्यास विज्ञान विभागातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. तसेच प्रस्ताव तयार करणे पासून ते अनुदान मंजूर होईपर्यंत सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे,प्राचार्य डॉ.अभय खंडागळे व प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले अशी माहिती उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभाग प्रमुख तसेच या योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एन. शिरसाट यांनी दिली.तसेच सदर अनुदान प्रक्रियेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार,उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कद, खजिनदार. अॅड. मोहनराव देशमुख साहेब,उपसचिव एल.एम. पवार,सहसचिव प्रशासन ए.एम.जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button