शुभम वाकचौरे
मोरडेवाडी ता.आंबेगाव येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व १२ विद्यार्थी असे एकूण १३ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा शहरी विभागातून गुणवत्ता यादीत आले आहेत अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांनी दिली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून सिद्धी संदीप मांझिरे २८४ गुण मिळवून राज्यात ३ री व पुणे जिल्ह्यात दुसरी आली. स्वरा सचिन मोरडे २६०, रुद्र विशाल मोरडे २५४, आशिष संभाजी निघोट २५४, धनश्री हनुमंत मोरडे २४६, वैभवी जितेंद्र काजळे २४६, उत्कर्ष गौरव राजगुरू २४४, अभिमन्यू अविनाश बोऱ्हाडे २३६, श्रावणी संतोष मोरडे २३६, अर्णवी नितीन निघोट २३६, यश मदनलाल मोदी २३४, कादंबरी संदीप भागवत २२४, प्रिया सचिन मोरडे २२२ हे विद्यार्थी शहरी विभाग जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने कमलजादेवी सेवा मंडळ मोरडेवाडी अध्यक्ष दत्तात्रय मोरडे, बबन मोरडे माजी संचालक कृषी उत्त्पन्न बाजार समिती मंचर, गजानन पुरी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख बाळासाहेब आडके यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमिला जोरी,संगिता वळसे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, सविता माळी, शिक्षणविस्तार अधिकारी गजानन पुरी, काळूराम भवारी, उषा मसळे, केंद्रप्रमुख बाळासाहेब आडके, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांताराम मोरडे, माजी अध्यक्ष राजू मोरडे, विजय घिसे, महेश बढे, कान्होबा डोंगरे, पंकजा हगवणे, पुष्पा कार्ले,रुपाली होनराव, मंगलादेवी पवार, कविता वळसे, रेश्मा ढोबळे, महानंदा मगरे, शंकर अण्णा मोरडे, बाजीराव मोरडे, विशाल मोरडे, ज्योती निघोट, प्रशांत मोरडे, सर्व ग्रामस्थ मोरडेवाडी यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन केले आहे.