जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर जुन्नर तालुका महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या महावितरण ऑफिसच्या समोरच्या आवारात वेगवेगळ्या ६० झाडांचे वृक्षारोपण मुख्याधिकारी ईश्वर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने वृक्षारोपण करून आषाढी एकादशी सण साजरा केला अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गाजरे यांनी दिली.
वृक्ष मनात रुजला तर तो मातीत रुजायला वेळ लागत नाही या म्हणी प्रमाणे आणि झाडे लावा झाडे जगवा याचा साक्षात्कार कृतीत येण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे आहे कारण आज भारत देशासह जगात जंगलतोड मोठया प्रमाणात झाल्याने यंदा सूर्यदेव कोपला होता त्याचा परिणाम भारत वासीयांनी अनुभवला आहे यामुळे जुन्नर महावितरण अधिकारी आणि कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्व प्रकारचे फळ व फुलझाडे लावण्यात आली सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गाजरे हे पण उपस्थित होते आणि त्यांनी पण वृक्षारोपण केले.
वृक्षारोपण केल्याने भविष्यात निसर्ग वैभव वाढीसाठी
महत्वपूर्ण ठरेल,खरेतर मानवाला वर्षभर २८० किलो ऑक्सिजन श्वासोच्छ्वास मिळतो.विशेष प्रत्येक झाड वर्षभर हवेत ३२० किलो ऑक्सिजन सोडते व त्याचबरोबर वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड ग्रहण करते त्यामुळे अशा वृक्षारोपण शिबिर आयोजित करण्यात यावीत की ज्याद्वारे मानवाचे जीवन पुन्हा सुजलाम सुफलाम होईल.