जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
रॉयल एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून संचलित ओतूर येथील इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी चे औचित्य साधून पायी बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बालचमुनीं पंढरपुरच्या वारीचा व दिंडी पालखी सोहळ्याचा अत्यंत भाविक भक्तीचा अनुभव घेत मनसोक्त आनंद घेतला.
मराठी महिन्यातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशी म्हटले की ओढ लागते पांडुरंगाच्या दर्शनाची आणि डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी.या वारीसाठी रॉयल एज्युकेशन इंग्लिश स्कूलच्या मुला मुलींनी आज पंढरपूरच्या वारीचा मनसोक्त आनंद घेतला. यामध्ये मुले विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले.आणि गावातून पालखी मार्गाने संपूर्ण वारीची परिक्रमा पूर्ण केली.
यासाठी संस्थेचे विश्वस्त, शाळेच्या मुख्याध्यापिका कासार सुजाता तसेच परिघा कदम , प्रिया भोर,स्वप्नाली औटी,हिना इनामदार,अश्विनी शिंगोटे,ऐश्वर्या साळे,राणी सातपुते,अंजली गुप्ता,सुरेखा पवार,शमा तांबोळी शुभांगी तांबे,अक्षया डुंबरे,आरती नायडू ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,तसेच पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.