शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार1
बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी परीषद पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा दीपाली शेळके यांनी दिली.‘बालरंगभुमी परिषद पुणे जिल्हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात १ ली ते ९ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी कै. नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करते. या वर्षी देखील हि स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण व शहर अशा दोन विभागात होणार आहे.
फॉर्म भरण्याची अंतीम तारीख स्पर्धकांच्या आग्रहामुळे —- जुलै 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्रांवर प्राथमिक फेरी 25 जुलै ते 07 ऑगस्ट या कालावधीमध्ये तर अंतीम फेरी 11 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार आहे. पारितोषीक वितरणाचा कार्यक्रम 11 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम फेरी केंद्रावरच संपन्न होईल असे, दीपाली शेळके यांनी सांगितले.‘प्रत्येक गटात अभिनय ३, उत्तेजनार्थ ३ व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धा चार गटात होईल. गट १: १ली, २री, गट २: ३री, ४थी, गट ३: ५वी ते ७वी, गट ४: ८वी आणि ९वी. असे गट असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे मोठे व्यासपीठ आहे. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष दीपक रेगे, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, नारायण करपे यांच्यासह बालरंगभूमीचे प्रमुख कार्यवाह देवेंद्र भिडे आणि कोषाध्यक्ष स्मिता मोघे यांनी केले आहे.
दरम्यान, 25 जुलै ते 7ऑगस्ट दरम्यान त्या-त्या तालुक्यातील केंद्रांमध्ये सोयीनुसार प्राथमिक फेरी होईल, अशी माहिती बालरंगभूमीचे कार्याध्यक्ष दिपक रेगे आणि निळू फुले अकादमी चे विश्वस्त सुरेश देशमुख यांनी दिली. तसेच माजी आमदार विजय कोलते यांचेही विशेष सहकार्य मिळाले आणि त्यांनीही या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.फॉर्म भरण्याची अंतीम तारीखः — जुलै 2024प्रवेश फीः 150/- रुपयेप्राथमिक फेरीः 25 जुलै ते 07 ऑगस्ट 2024अंतीम फेरीः 11 ऑगस्ट 2024 पुणे पारीतोषीक वितरणः ११ ऑगस्ट 2024 फॉर्म मिळण्याचे ठिकाणःशहर आणि ग्रामीण मधील नियोजित केंद्रांवर मिळतील संपर्कःदीपाली शेळकेः ९८२२५ ५५५२२देवेंद्र भिडेः ७४२०० ५०२९७स्पर्धा-प्राथमिक फेरी शहर केंद्र पुढीलप्रमाणे…