मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला रांजणगाव गणपती प्रशालेमध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी, अभंग गाथा, यासारखे ग्रंथ आणि वृक्ष ही ठेवण्यात आलेले होते पालखीचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील थोरात,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील लांडे,उपाध्यक्ष बापूसाहेब खेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
दिंडी सोहळ्यामध्ये अभंग गायनाबरोबरच व्यसनमुक्तीचा, मादक पदार्थ सेवन न करण्याचा, तंबाखूजन्य पदार्थ पासून मुक्ती, नशेपासून मुक्ती याचे संदेशही देण्यात आले.त्याचबरोबर ग्रंथ वाचनाचा आणि वृक्ष संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. या सोहळ्यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झालेले होते.सांस्कृतिक विभागाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .पालखी सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख केलेले बालक सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत होते .अनेक विद्यार्थिनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशी घेऊन
या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या होत्या. पालखी सोहळ्याचे स्वागत मुख्याध्यापक श्री सुनील थोरात यांनी केले.पालखी सोहळ्याचे नियोजन पर्यवेक्षक श्री सुभाष पाचकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख विशाखा पाचुंदकर,छाया शेलार,भाग्यश्री टाक,जयश्री थिटे,सुरेखा रणदिवे,कादरखान पठाण,संजय कर्डिले व इतर सर्व अध्यापक-अध्यापिका यांनी केले. सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.शेवटी महागणपती मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय व शाळेच्या प्रांगणात गोल रिंगण करून, वारकरी खेळ, फुगडी, अनेक खेळ खेळले गेले .विठू नामाचा जयघोष करत या पालखी सोहळ्याची सांगता झाली.