शुभम वाकचौरे
जांबूत: ( ता : शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने वारकरी दिंडीचे आयोजन केले होते. या वारकरी दिंडी साठी सर्व लहान मुलांनी वारकरी पोशाख परिधान केला होता. या पालखी सोहळ्यात अभंग, फुगड्या व विविध प्रकारचे खेळ खेळत लहान मुले या सर्व दिंडीचा आनंद घेत होते. एरव्ही शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस घेतलेले बाल वारकरी अगदी हुबेहूब वारकरी वाटत होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने काढलेल्या दिंडीचे अनेक ग्रामस्थांनी या दिंडीचे कौतुक केले. सर्व लहान विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले. ही दिंडी पाहण्यासाठी या वारकरी दिंडी मध्ये ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला. पंढरपूर ला गेलेला पालखी सोहळा जसाच्या तसा लहान विद्यार्थ्यांनेसाजरा केला. जांबूत मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभंग व गायन वादन करण्यात आले. वारीची ही परंपरा संत परंपरा, महाराष्ट्रची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा. वारकऱ्यांची परंपरा अखंड चालू राहण्यासाठी मुलां-मुलींना लहान वयातच वारीचे महत्व कळणे आवश्यक आहे. त्यांच्या मनात चांगले संस्कार रुजविण्यासाठी ‘याकरिता सदर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पोपट फिरोदिया, माजी सरपंच बाबा फिरोदिया , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कदम ,उपाध्यक्ष निलेश पठारे, कैलास गाजरे, अजय थोरात, बाळु चौधरी , अशोक गाडेकर, रामकृष्ण ढुमणे, मंगेश शहा, बाळासाहेब राऊत,सीमा तुळे, रुपाली मुंडलिक, ललिता गाडेकर, काजल रणसिंग, उमा आतकर, प्रतिभा कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक , शिक्षक वृंद व सर्व जांबूत ग्रामस्थ उपस्थित होते.