जुन्नर तालुका प्रतिनिधी:- रविंद्र भोर
दप्तर विना शाळा आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत ता.जुन्नर,पुणे येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात रिमझिम पावसाच्या सरी झेलत साजरा झाला.कुमशेत शाळा ते गावातील हनुमान मंदिर पर्यंत पायी दिंडी पालखी सोहळ्यात कुमशेत शाळा अंगणवाडीतील बालवारकरी सहभागी झाले होते दिंडी सोहळ्याची तयारी आकर्षक केली होती. विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता.मुलींनी नववारी साडी परिधान केली होती.डोईवर तुळस घेऊन टाळ मृदंग वाद्यांच्या घोषात पालखी संगे अभंगाचे गायन करत विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.तसेच मुलांनी झाडे लावा झाडे जगवा घोषणा देत पर्यावरण संदर्भातही घोषणा दिल्या .
या पालखी सोहळा निमित्त शाळेत विविध उपक्रम घेतले त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना रिंगण केले बालवारकऱ्यांनी संतांच्या अभंगांचे गायन केले.तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांनी इतिहास विषयातील संतांची कामगिरी धड्या विषयी पथनाट्य सादर केले.जनजागृती केली.संतांच्या वेशभूषा केलेल्या होत्या.
सर्व विद्यार्थ्यांनी फुगडी या पारंपरिक खेळात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच आनंद निर्माण झाला होता या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापक यशवंत घोडे सर,श्याम लोलापोड सर अंगणवाडी ताई संजीवनी नाईकवाडी बाई,सुलोचना डोके बाई विद्यार्थी पालक ग्रामस्थ सहभागी झाले होते.हा उपक्रम विद्यार्थ्यांना पालकांना खूप आवडला आणि मुलांना प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्याचा अनुभव आला या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.