(वनसंपदेचे रक्षण, सुरक्षित पर्यटन व गावाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी वन विभागाचा निर्णय)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
खिरेश्वर तसेच किल्ले हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेली विविध पर्यटन स्थळे अडराई,काळु धबधबा,प्राचीन नागेश्वर मंदिर,पिंपळगाव जोगा धरण क्षेत्र येथे पर्यटक,ट्रेकर्स, निसर्ग अभ्यासक असे अनेक तज्ञ मोठ्या संखेने पावसाळ्यात फिरायला व ट्रेकिंग साठी येत असतात.या कालावधीत सदर पर्यटनस्थळी अनुचित प्रकार घडू नये,वनसंपदा सुरक्षित रहावी तसेच सुरक्षित व जबाबदार पर्यटन होऊन खिरेश्वर गावचा पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने जुन्नर वनविभागाच्या वतीने शुक्रवार दि:- १२जुलै रोजी खिरेश्वर येथील खुबी बंधाऱ्यावर वनविभाग जुन्नर व संयुक्त वनव्यवस्थापन समिती खिरेश्वर यांच्या मार्फत पर्यावरण शुल्क नाका सुरू करण्यात आला आहे.
अमोल सातपुते उपवनसंरक्षक, जुन्नर यांच्या संकल्पनेतून अमित भिसे:- सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, वैभव काकडे:- वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांच्या उपस्थित हा पर्यावरण शुल्क नाका सुरू करण्यात आला.याप्रसंगी देवराम मेमाने:-अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती खिरेश्वर, विजय काठे:-सरपंच खिरेश्वर, कुसुम कवठे:- उपसरपंच, अभिजित भौरले:-पोलीस पाटील:-ग्रामपंचायत सदस्य वनविभागाचे वनपाल आर. डि.गवांदे,वनरक्षक कोमल डाखोरे वनरक्षक आर.के.फुलवड तसेच वन कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.