जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालय डिंगोरे विद्यालयास लायन्स क्लब ऑफ ओतूर आणि साई प्रतिष्ठान डिंगोरे चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी तुकाराम शेरकर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल बँक अंतर्गत दहा सायकल्स देण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर यांनी दिली.
पुष्पावती विद्यालय,डिंगोरे येथे परिसरातून लांबच्या अंतरा वरून विद्यार्थी शाळेत ये-जा करतात.त्यांचा बराचसा वेळ जाण्या-येण्यात खर्च होतो. अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळावा आणि त्यांचा वेळ वाचावा यासाठी लायन्स क्लब ऑफ ओतूर आणि साई प्रतिष्ठान चे वतीने सायकल बँक चे माध्यमातून गरीब होतकरू आणि लांबच्या अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता नुकतेच सायकलींचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे या वेळी विद्यार्त्याना शालोपायोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यासाठी मुक्तादेवी मंडळ डिंगोरे,सरपंच सीमा सोनवणे, उपसरपंच संपत खरात,राजेंद्र कुलकर्णी,खंडेराव आमले, पांडुरंग लोहोटे,दामोदर पानसरे यांनी विशेष योगदान दिले. विद्यालयातील परी भिसे, वेदिका लोहोटे,पल्लवी पारधी, अनुजा दुधावडे,आरती मोधे, मनीषा पारधी,सोनल मोधे,पूजा दुधावडे,प्रतीक्षा भले या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
याप्रसंगी मा. जि प सदस्य अंकुश आमले,ग्रामविकास मंडळ ओतूरचे खजिनदार रघुनाथ तांबे, उपसरपंच निलेश लोहोटे,संपत खरात,लक्ष्मण लोहोटे,वसंत लोहोटे, जयवंत शेरकर,अहिलु लोहोटे,शांताराम पानसरे,वैभव पाडेकर,बाळकृष्ण खरात, दत्तात्रय शिंगोटे,इब्राहिम मणियार,भीमसेन लोहोटे, दत्तात्रेय उकिरडे,राजेंद्र उकिरडे, सुभाष सोनवणे,अनिल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या निलोफर पठाण,संजय उकिरडे,सेवानिवृत्त पीएसआय भरत सुकाळे,रशीद खान पठाण,अंकुश भिसे, जगन्नाथ गाढवे,किसन भुतांबरे, विठ्ठल डुंबरे,रतिलाल बागुल, दत्तात्रय घोलप,मंगेश कोंडार, दिनेश पाटील,शिल्पा भालेराव, वैभव देशमुख,विजय काकडे,मंगेश डुंबरे, शिवाजी उकिरडे,रेवजी दुधवडे,आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.सायकल बँक या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.