जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे येथील आय टी आय च्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच “कॅम्पस ड्राईव्ह २०२४” चे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये ४ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी दिली.
प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा.लि. चाकण या कंपनीमार्फत कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आला सदर मुलाखतीसाठी प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा.लि.या कंपनीचे प्रोडक्शन विभागाचे असिस्टंट मॅनेजर बाळासाहेब थिटमे आणि राहुल सावंत हे उपस्थित होते.आय टि आय विभागातून या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल,काम करण्याची पद्धत याबाबत ची गुणवत्ता तपासून पाहिली. निवड झालेली विद्यार्थी पुढील प्रमाणे:-ड्राफ्ट्समन मेकॅनिकल विभाग-अभिषेक जुंदरे,संकेत बटवाल,आश्विन राऊत.फिटर विभाग-दया गुंड.
सदर मुलाखतीसाठी आयटीआयचे उपप्राचार्य विष्णू मापारी,प्रशांत औटी यांनी विशेष परिश्रम घेतले.निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.