जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
फेब्रुवारी २०२४ मध्ये परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय आणि शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एकूण १२ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.तालुका गुणवत्ता यादीत पहिले ८ विद्यार्थी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे आहेत.एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च(MTS) परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे अशी माहिती जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष धनेश संचेती,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साबळे सर,इंग्लिश मिडीयम स्कूलचे विभागप्रमुख सौ.गायत्री काजळे यांनी दिली.गुणवत्ता धारक विद्यार्थी
कौस्तुभ रामदास गवारी (राज्यात १५ वा )कौशल राजेंद्र कबाडी (तालुक्यात दुसरा ) प्रथमेश पंढरीनाथ शेळकदे(तालुक्यात तिसरा)केतकी अनिल उंडे (तालुक्यात चौथी )आराध्य ससाणे(तालुक्यात पाचवा)तनिष्का तिखे(तालुक्यात सहावा श्रुती संदीप पर्वते(तालुक्यात आठवी,स्नेहा सुनील मोदे.(तालुक्यात दुसरी )शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल,ओवी राजेंद्र भोर(तालुक्यात सातवी ) अर्णव महेंद्र लोखंडे(तालुक्यात प्रथम )शिवानी गणेश इंगवले(तालुक्यात तिसरी )आरूष सुहास आर्विकर (तालुक्यात चौथा )
महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा विशेष प्रावीण्य यश जालिंदर बारवेकर,प्रथमेश संदीप धाणापूने ,अथर्व विठ्ठल भुजबळ,कासार अर्णव प्रविण,साळवे प्रज्योत दीपक,जोगळेकर शुभदा सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, पालक यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील ,कार्याध्यक्ष धनेश संचेती,कार्यकारिणी ज्येष्ठ सदस्य नितीन मेहता,सुनील गुरव,आनंद सासवडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साबळे सर यांनी केले,उपस्थितांचे आभार.सदानंद उकिर्डे सर यांनी केले तर सूत्रसंचालन .गोपाळे मॅडम यांनी केले.