शुभम वाकचौरे
सरदवाडी: ( ता: ५). सरदवाडी गावच्या प्रथम महिला सरपंच सौ लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव व ग्रामपंचायत सदस्य शिल्पा घावटे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासी मूकबधिर विद्यालय सरदवाडी या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला.
आपल्या येथील लहान मुलांची मूकबधिर शाळा असल्यामुळें.तेथे गेल्यावर समजलं की आपल्या मदतीची व आधाराची खरी गरज कोणाला असते व कोणाला नसते तेथे गेल्यावर त्या मुलांच्या तब्येतीची त्यांच्या राहणीमानाची व त्यांच्या जीवनशैलीची विचारपूस केली. तर खरोखरच असं जाणवलं की कधी वेळ भेटला तर आवर्जून तेथे यावं कारण तेथे गेल्यावर त्या मुलांनी इतकं आपलंसं करून आमच्या संपूर्ण परिवाराचा व सर्व सहकाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने मनापासून स्वागत करण्याची जी पद्धत खरोखरच खूप आवडली व त्यांच्या सोबत मिळून मिसळून वाढदिवस साजरा करण्यात खूप आनंद झाला. वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वेलवेट पेन्सिल व खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, माजी पोलीस निरीक्षक इंद्रभान सरोदे, विजय उद्योग समूहाचे बंटी शेठ कुंडलिक, साई उद्योग समूहाचे दत्तात्रय सरोदे, सुनील कर्डिले , ह भ प गंगाधर कर्डिले, सुयोग घावटे,नाथा शेळके, ग्रामपंचायत सदस्य विद्या सरोदे, मोनाली कर्डिले, कृष्णा घावटे ,उमेश सरोदे,भगवान जाधव,मनोहर सरोदे, ओंकार सरोदे, यश गुंदेचा, प्रतिक निरवणे, सुजाता सरोदे, व ग्रामस्थ शिक्षक वृंद उपस्थित होते.