जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील ताम्हिणी आणि भुशी डॅम परिसरात दोन घटनांमध्ये एकूण सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांवर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी बंदी आदेश लागू केले आहेत.३१ जुलैपर्यंत हे बंदी आदेश लागू राहणार आहेत.तसेच वेगाने वाहणाऱ्या,खोल पाण्यात उतरणे व पोहण्यास बंदी,धबधबे,दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास बंदी,नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपानकरण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. मावळ,मुळशी,हवेली,आंबेगाव,खेड,जुन्नर,भोर, वेल्हा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने,बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झालेले आहेत.या तालुक्यात असणाऱ्या भुशी, मुळशी, भाटघर,खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षाविहार पर्यटनासाठी येत असतात.इतर दिवसांसह शनिवार,रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी वरील भागांत पर्यटक हे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून तसेच प्रामुख्याने मुंबई शहर व पुणे शहर या ठिकाणाहून येतात.तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके,पर्यटनस्थळे,धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील मावळ, मुळशी,हवेली,आंबेगाव, खेड,भोर,वेल्हा या तालुक्यात देखील सदर आदेश लागू करण्यात आला आहे.जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर,शिवनेरी व माणिकडोह या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहिलं.या आदेशानुसार पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे,थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध राहील. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.

सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे,टिंगल टवाळी करणे,महिलांशी असभ्य वर्तन करणे,असभ्य हावभाव करणे,शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे यंत्रणा वाजविणे, त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे,ज्या कृतीमुळे ध्वनी,वायु व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे,धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी,तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनांना अनुमती असेल.

या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था,संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहतील,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button