निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार

ओंकार गार्डन मंगल कार्यालय कौसर बाग या ठिकाणी ( दि. 26 )रोजी आशिक -ए रसूल कमिटी हाजी सोहेल खान यांच्या वतीने वधू – वर मेळावा तसेच कोमी एकता पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल जब्बार शेख(अध्यक्ष आशिक -ए रसूल कमिटी पुणे) पत्रकार मुन्ना मुजावर (उपाध्यक्ष आशिक- ए -रसूल कमिटी) रियाज मुल्ला, चांद शेख सर, फैजल रिश्तेवाला, शबाना मॅडम, कमरुनिसा शेख, जाकिया शेख, आज तक रिपोर्टर रमजान शेख, कमिटीचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी केले .

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हाजी सोहेल खान व हसीना इनामदार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमांमध्ये अनेक नव वधू -वर यांचा परिचय होऊन विवाहनिश्चित झाले. कमिटीचा हा 419 वा कार्यक्रम होता.यावेळी चांदभाई मनियार (उपाध्यक्ष दौंड तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग) यांना सामाजिक कामातील योगदान हिंदू मुस्लिम सामाजिक एकता, सदभावना, शांतता बंधूता, जाती सलोखा, जोपासण्याचे यशस्वी कार्य आणि योगदान पाहून हाजी सोहेल खान यांच्या हस्ते कोमी एकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक बंधू-भगिनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button