जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
उदापूर ता:-,जुन्नर येथील ग्रामपंचायत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान ग्रामसभा अनेक विषयांवर चांगलीच गाजली.परंतु गावनेत्यांनी वेळीच हस्तक्षेप करत तात्विक स्वरूपाचे होणारे वाद जागीच थांबवले आणि गावचा एकोपा टिकून ठेवून आपण सर्व ग्रामस्थांनी गावाच्या विकासा साठी एकत्र येण्याचे आवाहन केले.यावेळी सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सैनिक सुनील तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.
दरम्यान सरपंच सचिन आंबडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली.यावेळी उपसरपंच जयश्री अमुप, सदस्य डॉ.पुष्पलता शिंदे, विनोद भोर छाया चौधरी, पूनम शिंदे, चैत्राली शिंदे, वैशाली शिंदे, राजेंद्र कुलवडे, नीलेश नारुडकर,सिद्धेश भोईर, ग्रामसेवक मच्छींद्र कवडे, श्रीराम देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पांडुरंग शिंदे, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष बबन कुलवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक तुळशीराम शिंदे, उपाध्यक्ष जालिंदर शिंदे,विद्या विकास अध्यक्ष प्रभाकर शिंदे, माजी सैनिक दिलीप आरोटे,माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन वलव्हणकर, वि.का.सोसा अध्यक्ष संजय बुगदे, प्रकाश कुलवडे, संजय शिंदे, पोलिस पाटील अमित ठोसर,आशिष जगताप,मनोज चौधरी, राजू अमुप, अशोक शिंदे, सचिन शिंदे, संपत शिंदे, प्रवीण कुलवडे, राहुल कुलवडे, अमोल म्हसणे, संतोष माळवे, चंद्रकांत माळवे, तानाजी आरोटे, तुषार डोके, अविनाश शिंदे संजय ढमढेरे, साईनाथ भोर, वनरक्षक गिते, कृषी अधिकारी राठोड उपस्थित होते