मा ॲड बापू.. यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तीवंत व्हा, आपल्या या कार्यास व वाढदिवसानिमित्त श्री प्रदीपभाऊ साळुंके युवा मंच व समस्त ग्रामस्थ निर्वी व शिरूर-हवेलीतील जनतेकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा..!
निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
लोकाभिमुख नेता आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बापूंची जनसामान्यांमध्ये ओळख ही सर्वसामान्यातील असामान्य, अशी बनली आहे. समाजभान जपत जनसामान्यांची नाळ जोडून बापूंनी शिरूर- हवेलीचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. बापूंनी , सामाजिक, राजकीयदृष्ट्या नावाजलेल्या यामतदारसंघाची ओळख राज्याला पुन्हा नव्याने करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार .ॲड अशोक बापू पवार यांनी राज्यातील विकासांमध्ये रोल मॉडेल म्हणून लौकीक मिळविला आहे. अशोक पवार यांनी मतदारसंघात सर्वसामान्य आणि गरजू घटकांसाठी दूरगामी विचार करून अनेक योजना प्रत्यक्षात साकारल्या आहेत. याच योजना राज्यासाठी पथदर्शक ठरल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वास अनेक पैलू आहेत.रस्त्यांची गुणवत्ता सुधारलीगावोगावी, वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तथा राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून रस्ते बनवले जात असत. बापूंनी सामान्य नागरिकांना रस्त्यांची गुणवत्ता व दर्जा कसा तपासावा याबाबत प्रबोधन केले. यातून अनेक भागातील रस्ते जे वर्षानुवर्षे खड्डेमय दिसत होते. प्रशासकीय यंत्रणा आता ठेकेदार अलर्ट झाल्याने हे रस्ते पहिल्यांदा सुधारलेले आहेत.आपल्या भागातील विकासकामांबाबत नागरिक जागरूक करण्यामध्ये बापूंचा सिंहाचा वाटा आहे.
राज्य शासनाकडून नाममात्र भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या जागांवर अनेक दवाखाने उभे राहिले आहेत. या रुग्णालयाकडून दरवर्षी गोरगरिबांना मोफत उपचाराची सुविधा मिळत होती. परंतु सुविधेचा वापर योग्य पद्धतीने केला जात नव्हता. पंधरा वर्षांपासून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी धर्मादाय आयुक्त, राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा व पाठपुरावा केला.त्यांनी गोरगरिबांचा दोन लाखांपर्यंतचा वैद्यकीय उपचाराचा खर्च माफ करून दिला आहे. शिरूर-हवेलीतील कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय सुविधा गोरगरिबांना मिळवून देण्यात बापू यशस्वी झाले आहेत. आजही गावोगावी वैद्यकीय सुविधेचा लाभ अल्प उत्पन्न गटातील लोक घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटलमधील सुविधा आणि योजना पोहोचवून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.शुद्ध पेयजलसाठी पाठपुरावा शिरूर – हवेली या दोन तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, • यासाठी लोकसंख्येनुसार शासनाकडे पाठपुरावा करून शुद्ध पेयजल योजना कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवण्यात पवार यशस्वी झाले आहेत. अनेक गावांसाठी पाण्याची योजना राबवली आहे.ही पाणी योजना खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे.
मा बापू.. यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तीवंत व्हा, आपल्या या कार्यास व वाढदिवसानिमित्त श्री प्रदीपभाऊ साळुंके युवा मंच व समस्त ग्रामस्थ निर्वी व शिरूर-हवेलीतील जनतेकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा..!