सेवानिवृत्त लिपीक कैलासराव बोंबे यांचेकडून विद्यालयाला देणगी प्रदान करताना , समवेत पदाधिकारी व संचालक मंडळ.
शुभम वाकचौरे
दि. ०२- पिंपरखेड (ता.शिरूर) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक कैलासराव बाजीराव बोंबे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास शिक्षणसंस्थेसाठी ७५ हजार रुपयांची रोख देणगी देत त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.कैलासराव बोंबे हे गेली ३८ वर्षे पिंपरखेड (ता.शिरूर) येथील ग्रामविकास शिक्षण संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. आपल्या सेवेच्या माध्यमातून केलेल्या प्रामाणिक व पारदर्शक कारभारामुळे त्यांना दोन वेळा आदर्श लिपिक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
आपल्या नोकरीबरोबरच त्यांचे पिंपरखेड गावच्या शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्मिक जडणघडणीत मोठे योगदान असून या सेवापूर्ती वेळी त्यांची शिक्षण संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने गावातून ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध भेटवस्तू देत भव्य सत्कारही करण्यात आला. तसेच त्यांचे वडील बाजीराव बोंबे , आई राधाबाई ,पत्नी उल्का, मुलगा अमोल , कीर्ती , स्नुषा पूजा यांचा कौटुंबिक सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करणेत आला.
प्रसंगी त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, तज्ञ संचालक पोपटराव थिटे , माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे ,अरुणा घोडे , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद ढोमे, माजी सरपंच भिवाजी बोंबे, प्रकाश गुजर, प्राचार्य रामदास मगर, आर.बी. गावडे, सेवानिवृत्त प्राचार्य अप्पासाहेब शेळके, बबनराव बोंबे, प्रफुल्ल बोंबे, वैभव उंडे यांचेसह ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण ढोमे व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमासाठी परिसरातील विविध गावचे सरपंच , उपसरपंच , सहकारी सोसायटीचे पदाधिकारी , विविध शिक्षणसंस्थांचे प्राचार्य , आजी माजी शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , ग्रामस्थ ,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ.एन.पंचरास , एस.आर.बराटे यांनी केले. आभार माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष तानाजी पोखरकर यांनी मानले.