शुभम वाकचौरे
जांबूत : प्रवाशांच्या दररोज मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादानंतरही परळ – जांबुत मार्गावर नागरिकांना मिळणारी बस सेवा ही व्यवस्थित नसून चक्क बिघडलेल्या व खराब स्थितीत असलेल्या बसच या मार्गावर चालविल्या जात आहेत. यासंदर्भात प्रवाशांनी २८ ऑगस्ट, २०२२ रोजी देखील कळविलेले होते. तरीही परळ – जांबुत हि बस कित्येकदा बंद पडल्याने . हा प्रवास दुसऱ्या बसने देखील कित्येकदा करावा लागल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.
सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या एसटीकडे महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी या घोषणेसोबत प्रवास करणारी एसटी राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचली. मात्र त्या बसगाड्यांची अत्यंत दुर्दशा आहे. बसच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. तर काही गाड्यांना इंडिकेटर नाहीत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असतानाही महामंडळाने मात्र दुर्लक्षच केले आहे.शुक्रवारी दिनांक २८ जुन,२०२४ रोजी तर परळ – जांबुत ही बस लोणावळा स्थानकातच सकाळी पावणे नऊ वाजता खराब झाली व त्यानंतर वाहकाने तर जुन्नर, नारायणगाव, मंचर इकडे जाणाऱ्या व प्रवाश्यांनी फुल भरलेल्या बसमध्येच प्रवाश्यांना जाण्यासाठी सांगितले. त्यातील कित्येक प्रवाश्यांनी मिळेल त्या बसने प्रवास केला तर काहींनी खाजगी गाड्यांनी प्रवास केला. शेवटी गाडीतील जवळजवळ १५-२० प्रवाशी अशे होते जे दुसऱ्या गाडीने जाऊच शकत नव्हते कारण त्यांच्या गावासाठी परळ – जांबुत ही एकमात्र गाडी असते. बसमध्ये कित्येक वयस्कर प्रवाशी असल्याने त्यांना दुसऱ्या बसने प्रवास करणे देखील अवघड होते.
प्रवाशांनी विनंती केली की जोपर्यंत इथे दुसरी बस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत आम्ही प्रवाशी खराब झालेल्या बसमध्येच बसून राहू असे सांगत दुसऱ्या बसची मागणी केली. अश्यावेळी लोणावळा स्थानकातील आगारप्रमुखांना देखील नागरिकांनी संपर्क साधला असता. पनवेल आगारप्रमुखांनी सांगितले की आमच्याकडे बसच नाहीत. शेवटी दुपारी सव्वा १ वाजता परळ आगारप्रमुख दीपक चव्हाण यांना संपर्क केला असता. त्यांनी दुसरी बस उपलब्ध केली.बस ही लोणावळा मध्ये प्रवाश्यांना घेण्यासाठी दुपारी ४:३० वाजता पोहचली व जांबूतला रात्री ९:१५ ला पोहचली. सदर बसच्या खराब स्थितीबाबत व परिवहन कडून नागरिकांना मिळालेल्या गलिच्छ सेवेसंदर्भात नागरिकांनी लिखित तक्रार लोणावळा स्थानकात केलेल्या आहेत.
परळ आगारप्रमुख दीपक चव्हाण यांना सांगितले होते. की परळ – जांबुत या मार्गावर उद्यापासून चांगली बस उपलब्ध करण्यात यावी. तरी देखील त्यांनी शनिवार व रविवारी देखील खराब बस सदर मार्गावर उपलब्ध केलेल्या होत्या. दि २८ जून रोजी प्रवाश्यांनी बसच्या खराब स्थितीबाबत व परिवहन कडून नागरिकांना मिळालेल्या गलिच्छ सेवेसंदर्भात नागरिकांनी लिखित तक्रार लोणावळा स्थानकात केलेल्या आहेत.
– प्रवाशी नागरिक.
परळ आगारप्रमुख दीपक चव्हाण यांना बस संदर्भात चर्चा करण्यासाठी फोन केला असता. त्यांनी फोन रिसीव करून पत्रकार हे नाव ऐकल्यावर फोन कट केला. व त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.
-
पत्रकार
शुभम वाकचौरे