जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
आष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे अंगारिका चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते.या यागामध्ये एकूण पंच्याहत्तर यजमान जोडप्यांचा सहभाग होता. गणेश सांगता महाआरतीने झाली . अंगारिका चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर संपन्न झालेल्या महाआरतीसाठी महाआरतीचे मानकरी,चंद्रकांत येंधे,अजित थोरात,सुनिल खांडगे,गणेश वाखारे,ईश्वर गायकर,गणेश नेहरकर,संतोष शेटे
अमित चौधरी,विनायक मांडे,वैभव गवांदे,निलेश भटटेवार, हे यजमान म्हणून लाभले.अंगारिका चतुर्थीच्या दिवशी पहाटे पहाटे ५.०० वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनिल घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त विक्रम कवडे,प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे,गोविंद कवडे,विलास कवडे,विनायक मांडे,संतोष कवडे,समीर मांडे,मंगेश पोखरकर,विनायक जाधव ,शिल्पा जगदाळे,व ग्रामस्थ यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. अंगारिका चतुर्थी च्या शुभमुहूर्तावर ओझर मंदिरावर फुलांची आरस,संपूर्ण मंदिरास लाईट करण्यात आले होते. पहाटे चार ते रात्री आकरापर्यंत सुमारे तीन लक्ष भाविकांनी रागेत दर्शनाचा लाभ घेतला सकाळी ७.०० वा. महाआरती व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली.अंगारिका चतुर्थी निम्मित श्री सुर्यकांत रवळे यांनी अन्नदान केले.येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,शुद्ध पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान ,चप्पल stand पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.सायंकाळी ७.०० वा नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प चंद्रकांत महाराज डुंबरे,ओतूर यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत शिरोली खु!! येथील भजनी मंडळाने दिली.रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.या शुभ दिनी आविष्का अनिष ओसवाल २१०००,व बाळासाहेब सांडभोर २१००० यांनी देणगी दिली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनमधू ,गणेश याग,महाआरती,गंगाआरती साठी उपस्थित मान्यवर यांनी देणगी दिली. तसेच देवस्थान ट्रस्ट च्या महाप्रसादलयामध्ये दोन हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला .गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ,अध्यक्ष व कर्मचारी वर्ग व ओतूर पोलीस स्टेशन यांनी केले.