जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
विद्यार्थ्यांनी व्यसनापासून,अमली पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.जीवन खूप सुंदर आहे.या जीवनावर आपण शतदा प्रेम केले पाहिजे,”अशा आशयाचे विचार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी चैतन्य विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर बोलताना मांडले. आज राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली.त्याचवेळी जागतिक अमली पदार्थ दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी थाटे बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले की,”मी जीवनभर व्यसनापासून दूर राहील व कधीही अमली पदार्थांचे सेवन करणार नाही,अशी आपण मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे.व्यसनापासून दूर राहिल्यास आपली प्रकृती ठणठणीत राहील व चांगले आरोग्य आपणास लाभेल.”छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपटही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यावेळी व्यासपीठावर समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे,ग्रामविकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे,मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, उपमुख्याध्यापक संजय हिरे,पर्यवेक्षक अनिल उकिरडे बाळासाहेब साबळे,मंगेश तांबे,शरद माळवे,वनिता भोर,प्रमोद जाधव, देवचंद नेहे,दिनेश ताठे,आसावरी गायकर,साक्षी देशमुख,अमित झरेकर,योगेश फापाळे, अरविंद आंब्रे,पोलीस हवालदार धनंजय पालवे,पोलीस शिपाई रोहित बोंबले आदी मान्यवर ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मिलिंद एकबोटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले तर अजित डांगे यांनी आभार मानले.