पुणे प्रतिनिधी
दि. २५ जून २०२४सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बु., पुणे-४१ मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये योगदिनाचे औचित्य साधून मार्गदर्शनपर व्याख्यान व योगासने आयोजित करण्यात आल्याचे प्रा. एम. एन. नामेवार व प्रा. तुषार काफरे यांनी सांगितले.द ब्रिथ सेंटर, पुणे च्या प्रशिक्षक सौ नीता साबळे (योग थेरिपिस्ट, आयुष मंत्रालय) यांनी सदर कार्यक्रमास मार्गदर्शन केले व ताडासन, धनुरासन, त्रिकोणासन, सर्वांगासन भुजंगासन, मयुरासन, असे विविध आसनांचे प्रकार उपस्थितांकडून करून घेतले.
सूर्यनमस्कार व विविध प्राणायाम यांची माहिती देवून नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक समाधान लाभते असे वक्तव्य योगाचे महत्त्व सांगताना सौ. नीता साबळे यांनी केले.सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे, उपप्राचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी, विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. एस. एस. लोखंडे यांनी आयोजन तर प्रा. एस. ए. कोटी यांनी सूत्रसंचालन केले.