प्रतिनिधी: जिजाबाई थिटे 1
श्री.भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा ता. शिरूर या विद्यालयास कॉन्सेंन्ट्रिक पंप प्रायव्हेट लि.लोणीकंद या कंपनीकडून १५० बेंचेस व ८कपाटे सी.एस.आर.फंडातून देण्यात आली.शुक्रवार दि२१जून रोजी विद्यालयामध्ये साहित्य अर्पण सोहळा कंपनीच्या एच.आर.हेड सजनी नायर ,फायनान्स हेड महेंद्र पारीक, ऑपरेशन हेड विजय हेडके,वरीष्ठ प्रबंधक रमेश बागल,सी.एस.आर.हेड सोनाली शामसुंदर संस्थेचे व्यवस्थापक अनिकेत बेनके,सचीव मनोहर भोसले,पांडूरंग वेताळ,योगीराज मोरे,विलास वाघचौरे,सरदार रघुनाथ ढवळे विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे,विद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी कुटे इ.इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांनी प्रास्ताविकेमध्ये शाळेच्या प्रगतीचा आढावा घेवून विद्यालयामध्ये राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती सांगितली आणि उपस्थितांचे स्वागत केले.एच आर हेड सजनी नायर मॅडम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेमार्फत देत असलेल्या शिक्षणाच्या सुविधांचा गौरव केला आणि कंपनी तर्फे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठीआणि भौतिक सुविधा पुरवण्यासाठी निश्चितच सहकार्य राहील अशा प्रकारची ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी प्रा.संतोष शेळके, अंबादास गावडे,दिलीप वाळके ,ज्योती गजरे,सतीश अवचिते,मच्छिंद्र बेनके, शरद शेलार,बाबुराव मगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार नितीन गरूड यांनी मानले.