प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
भांबर्डे (ता.शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांचे चिरंजीव तेजस कदम याने विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालय शिरूर येथील विज्ञान शाखेतून ९२.३३% गुण आणि MH-CET परीक्षेला ९९.८८ पर्सेंटाइल मिळवून शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवल्याने या यशाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. तेजसची आई रेखा कदम ह्या आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तेजसने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर येथे पूर्ण केले. याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षक आणि प्राचार्या अश्विनी घारू यांच्या मार्गदर्शनाखाली तेजसने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ९५.२०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तेजसने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळविली. इयत्ता सहावीत असताना शासकीय इलेमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेत ‘B’ ग्रेड तर सातवीत असताना इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ‘B’ग्रेड मिळविलेला आहे.” जिद्द, चिकाटीआणि शिक्षणाची आवड असल्यास यशलाही गवसणी घालता येते. मी बारावीनंतर इंजीनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा ठरविले होते. त्यासाठी JEE (मेन्स), JEE (ऍडव्हान्स) आणि MH-CET या परीक्षा द्याव्या लागतात हे माहीती असल्याने मी कुठेही अकॅडमीला प्रवेश न घेता घरूनच वेळेचे नियोजन करून नियमित अभ्यास केला. मला JEE (मेन्स) ला ९७.२६६ आणि MH-CET परीक्षेला ९९.८८ परसेंटाइल मिळाले. या गुणांच्यावर नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात नक्की प्रवेश मिळेल.” *तेजस कदम* तेजसच्या यशात आई-वडील, शिकवणारे शिक्षक आणि प्राचार्य संजय शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तेजसला बारावीत इंग्रजी विषयात ७९, गणित ९७, भौतिकशास्त्र ८९, रसायनशास्त्र ९४, आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात १९५ गुण मिळालेले आहेत. तेजसने इलेक्ट्रॉनिक्स विषयात याच विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यास नारायण पाचूदंकर,राजू सुकळे, कृष्णा फराटे, श्रावस्ती सरकटे, छाया उबाळे, अर्जुन वनवे, संजय देशपांडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.