जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोसले
समर्थ संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्नसमर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.या दिनानिमित्त आज बहु संख्येने गुरुकुल,ज्युनियर कॉलेज, इंजिनिअरिंग,बी सी एस,फार्मसी व संकुलातील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समर्थ शैक्षणिक संकुलास भेट देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे व क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर यावेळी उपस्थित होते
उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे म्हणाले की,योग ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची बाब आहे.योगामुळे मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होतो.शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होते असे ते म्हणाले.योग प्रशिक्षक एच.पी. नरसुडे,डॉ.राजाभाऊ ढोबळे व किर्ती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली। सूर्यनमस्कार,योगासने,प्राणायाम, ध्यान व प्रार्थना आदीचे प्रात्यक्षिक या वेळी करून दाखवण्यात आले.तसेच योगाचे दैनंदिन जिवनातील फायदे सांगण्यात आले.वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्धर व्याधी योगासनामुळे सहजरित्या नष्ट होण्यास मदत होते.योग ही एक साधना असून सातत्यपूर्ण सरावाने मनुष्याच्या जीवनात चांगल्या प्रकारचे अमुलाग्र बदल होऊ शकतात. योगामुळे स्मरण शक्ती वाढते.शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.तसेच प्राणायाम केल्यामुळे श्वसनाचे विकार बरे होण्यास मदत होते.गुडगे दुखी,पाठदुखी,कंबर दुखी या पासून आराम मिळतो.योगामुळे शरीराबरोबर मन देखील निरोगी राहण्यास मदत होते.यम,नियम,योगासन,प्राणायाम, प्रत्याहार,धारणा,ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत.प्राणायामा मुळे शारीरिक व मानसिक शक्ती बळावते.शरीर निरोगी राहतेच पण मन सुद्धा निरोगी राहते.प्राणायामामुळे शरीर व मन शुद्ध होऊन मनाची एकाग्रता वाढते.अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.ध्यानधारणे मुळे मनुष्याच्या मनाला शांती मिळण्यास मदत होते तसेच चेहऱ्याची कांती सुधारून तेज मिळते.हास्यासन,सुखासन, गरुडासन,ताडासन,शीर्षासन,सूर्यनमस्कार,धनुरासन, वज्रासन,भुजंगासन,कपालभाती,भसरिका,अनुलोम-विलोम आदी प्रकार व प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली.प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी कपालभाती,अनुलोम-विलोम करून दाखवले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,क्रीडा संचालक एचपी नरसुडे,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.सुनील गुजर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या वैशालीताई आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच सर्व विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी केले.