जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
”संपूर्ण विश्वामध्ये बुद्धी,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी व वैश्विक बंधुभाव वाढवण्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे.रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.” अशा आशयाचे प्रतिपादन योगशिक्षक अजित नलावडे यांनी येथील चैतन्य विद्यालयात झालेल्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने केले. ग्रामविकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात आज जागतिक योग दिन संपन्न झाला.यावेळी नलावडे यांनी योग प्रशिक्षणाबरोबर अनेक प्रकारची योगासने करून दाखवली.ते म्हणाले की,”योग करेगा भारत, स्वस्थ रहेगा भारत”.योगा चे जनक महर्षी पतंजली यांच्या कडून मिळालेल्या हा अनमोल ठेवा जपून योग करूया,,,!अशा प्रकारचे आवाहन योग प्रशिक्षक नलावडे यांनी योग प्रशिक्षण करताना केले. योगा दिनानिमित्त भद्रासन,अर्धेमत्सेंद्रासन,उष्ट्रासन ,सेतुबंधासन,सर्वांगासन,मत्स्यासन,भुजंगासन धनुरासन,त्रिकोणासन,ताडासन,भस्रिका,भ्रामरी ओंमकार,कपालभाती, हे प्राणायमचे प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. यावर्षी योगा दिनाची संकल्पना”महिलांसाठी योगा”ही संकल्पना शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी योगा करून उत्तम प्रशिक्षण घेऊन आत्मसात केली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, उपमुख्या.संजय हिरे, प्रदीप गाढवे,शरद माळवे, राजाराम शिंदे,देवचंद नेहे,एम एम तांबे,प्रमोद जाधव, बाळासाहेब साबळे,संतोष सोनवणे यांनी विद्यार्थ्यां– बरोबर योगासने केली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल चौधरी,अजित डांगे,मिलिंद खेत्री, संतोष कांबळे, लक्ष्मण दुडे, आसावरी गायकर,आशा गाडेकर,सोनाली कांबळे,सोनाली माळवे,दिनेश ताठे, अनिल जवरे,आशा डुंबरे,अपेक्षा गोरे,अश्विनी नलावडे, सौरभ ढमाले,हर्षल शितोळे,योगेश फापाळे,ईश्वर ढमाले,साक्षी देशमुख,निर्मला डोंगरे,आराधना इसकांडे, विजय खरात, प्रसन्न तांबे, मयूर जाधव आदींनी सहकार्य केले.देवचंद नेहे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर अमित झरेकर यांनी आभार मानले.