जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा- उदापूर ता:-जुन्नर या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शुक्रवार दि:-२१ जून २०२४ रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदापूर या शाळेतील ९५ विद्यार्थी यांनी अत्यंत मनमोहक आणि सुयोग्य अशा हालचालींनी विविध योगासने करीत योगदिन संपन्न केला. हे सर्वप्रथम स्वामी विवेकानंद,अरविंद घोष यांनी जगाला सांगितले.अलिकडे हे जगाला पटून भारताच्याच मागणीने २०१५ पासून २१ जून “आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपन्न होतोय.ही भारताने जगाला अर्पण केलेली निरामय आरोग्याची मोफत उपचाराची सर्वात मोठी भेट.आज म्हणूनच ॐ कार जगभर निनादतो आहे.योगाचे महत्व उपशिक्षक सत्यवान म्हस्के व सुनिल चौधरी यांनी सांगितले आनंदी जीवनासाठी निरामय शरीरस्वास्थ आणि तणावरहित शांत मनस्वास्थ हवे.मग गरीबअसो वा श्रीमंत सर्वांनाच आनंदी जीवन लाभण्यासाठी उपयुक्त असा मोफतचा राजमार्ग अर्थातच योगमार्ग. “रोज करा योग दूरच ठेवा रोग” या उक्तीनुसार शाळेच्या प्रांगणात पद्मासन,वज्रासन,हलासन, ताडासन,अर्धपद्मासन,शवासन,भद्रासन,ध्यान हे आसनप्रकार प्रात्यक्षिक किसन दाभाडे यांनी घेतले. याप्रसंगी उदापूर केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब भालेकर तसेच मुख्याध्यापक श्रीमती माणिक फापाळे ,सत्यवान म्हस्के,सुनील चौधरी, स्मिता डुंबरे,उर्मिला चौधरी हे शिक्षक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी योगासनाचे अत्यंत सुंदर प्रात्यक्षिक करून दाखवले.या निमित्ताने सन्मा.केंद्रप्रमुख बाळासाहेब भालेकर यांनी योगाचे महत्त्व आणि योग केल्यामुळे आरोग्यास होणारे फायदे या विषयावर अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले सदर प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते