जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
२१ जून जागतिक दहावा योग दिन चिल्हेवाडी शाळेत साजरा करण्यात आला.अखिल विश्वाला निरामय आरोग्यासाठी संजीवन योगमार्गाची दिक्षा बहाल करणाऱ्या भारतीय ऋषी-मुनी योगींनी जगाला योग मार्ग दिला.आज भारतीय संस्कृतीची मुल्ये ही जगमान्य झालीत.याचे कारण निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असलेले योग आहेत.योग ही अध्यात्म विद्या आहे,जी विज्ञानही आहे व चिकित्सा पद्धतीही आहे, हे सर्वप्रथम स्वामी विवेकानंद,अरविंद घोष यांनी जगाला सांगितले.अलिकडे हे जगाला पटून भारताच्याच मागणीने २०१५ पासून २१ जून “आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपन्न होतोय.ही भारताने जगाला अर्पण केलेली निरामय आरोग्याची मोफत उपचाराची सर्वात मोठी भेट.आज म्हणूनच ॐ कार जगभर निनादतो आहे.योगाचे महत्व उपशिक्षक प्रभाकर दिघे यांनी सांगितले आनंदी जीवनासाठी निरामय शरीरस्वास्थ आणि तणावरहित शांत मनस्वास्थ हवे.मग गरीबअसो वा श्रीमंत सर्वांनाच आनंदी जीवन लाभण्यासाठी उपयुक्त असा मोफतचा राजमार्ग अर्थातच योगमार्ग. *रोज करा योग दूरच ठेवा रोग* या उक्तीनुसार शाळेच्या प्रांगणात पद्मासन, वज्रासन,हलासन,ताडासन,अर्धपद्मासन,शवासन,भद्रासन,ध्यान हे आसनप्रकार प्रात्यक्षिक किसन दाभाडे यांनी घेतले. या प्रसंगी शालेय विद्यार्थी,व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भोईर,संजय ठोंगीरे,राजेंद्र भोईर,हरिभाऊ भोईर,गिरिजाभाऊ भोईर,दामोदर बूळे, बाळू ठोंगिरें,चंद्रकांत भोईर,केशव भोईर,पांडुरंग तातळे,गणपत तातळे,जीवन भोईर,सुभाष भोईर व पालक यांनी योग प्रात्याक्षिक केले.