प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे सदिच्छा भेटी दरम्यान पुणे जिल्हा शिक्षक परीषदेचे कार्यवाह महेश शेलार यांनी शिक्षकांशी हितगुज करताना माध्यमिक शिक्षकांच्या अनेक समस्याची चर्चा करत संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आश्वासित केले. याप्रसंगी शिक्षकांची वैद्यकीय बिले, पेन्शन फाईल ,नवीन मुख्याध्यापक मान्यता ,रखडलेली पगार बिले, शाळा अनुदान वाढीव टप्पा याबाबत लक्ष घालून संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.विद्यालयाच्या वतीने प्राचार्य तुकाराम बेनके यांनी स्वागत करून शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत अशा प्रकारचे मत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे मा.अध्यक्ष प्राध्यापक नारायण पाचुंदकर तसेच रांजणगाव गणपती वि.का. संस्थेचे मा.व्हाईस चेअरमन मोहनशेठ लांडे , शाळा व्यवस्थापक अनिकेत बेनके ,प्राध्यापक संतोष शेळके, अंबादास गावडे, दिलीप वाळके, संतोष हिंगे ,रवींद्र चौधरी शरद शेलार, बाबुराव मगर मच्छिंद्र बेनके इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.