बुलेट गाडीचे सायलेन्सर प्रशासनाने केले जप्त.
जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
जुन्नर शहर आणि परिसरामध्ये तालुकास्तरीय अनेक शासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये जुन्नर तहसील कार्यालय जुन्नर पोलीस स्टेशन दिवाणी व फौजदारी न्यायालय त्याचप्रमाणे जुने एसटी स्टँड ते नवीन एसटी स्टँड पंचलिंग चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा ते शिवछत्रपती महाविद्यालय या ठिकाणी दिवसभर भरपूर नागरिकांची गर्दी असते. जुन्नर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नागरिकांना आपली अनेक शासकीय निमशासकीय कामे पार पाडण्यासाठी जुन्नर शहरात यावे लागते त्याचप्रमाणे आदिवासी भागातील सर्वच विद्यार्थ्यांना शिवछत्रपती विद्यालय या ठिकाणी यावे लागते. या जुन्नर शहरातील सर्वच रस्त्यांवर अनेक नागरिक पायी प्रवास करत असताना बरेच दिवसांपासून बुलेट चालक आपल्या बुलेटला आरटीओ विभागाची कुठलीही परवानगी न घेता फटाके फोडणारे सायलेन्सर त्याचप्रमाणे मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसून अचानक आवाज वाढवून वरदळीच्या ठिकाणी ये जा करत असतात यांच्या ह्या हवा तसा त्रास कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी नागरिकांना देखील होत असल्याची माहिती जुन्नर पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक विभागाला कळल्यानंतर जुन्नर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांच्या सूचनेनुसार ट्राफिक विभाग प्रमुख दीपक वनवे मंगेश कारखिले ट्राफिक वॉर्डन बाळकृष्ण खंडागळे मोहन गायकवाड यांनी जुन्नर मधील पाच रस्ता चौक या ठिकाणी ध्वनी प्रदूषण करणारे आणि वेगाने बुलेट चालवणाऱ्या बुलेट चालकांविरोधात आणि गाड्यांवर भारतीय दंड संहितेच्या नियमानुसार दंड रकमेची कारवाई केली आहे. एका महिन्यामध्ये या दंड वसुलीचा आकडा सव्वातीन लाखापर्यंत असून ट्रिपल सी गाडी चालवणे नंबर प्लेट नसणे त्याचप्रमाणे वाहन परवाना न बाळगणे फॅन्सी नंबर प्लेट अशा सरकारी नियमांचा भंग केल्याबद्दल 384 वाहन चालकांवर जुन्नर पोलिसांनी कारवाई केली असून त्यातून अंदाजे तीन लाख 37 हजार रुपयांच्या रकमेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.