जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास योजनेअंतर्गत ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात मोफत एसटी पास चे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.यावेळीकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे होते. यावेळी पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील,नारायणगाव आगार प्रमुख वसंतराव अरगडे,नारायणगाव वाहतूक नियंत्रक विष्णू राठोड, ओतूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सखाराम मिलखे,सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप,संजय हिरे, अनिल उकिरडे यांचे शुभहस्ते विद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत पास वाटप करण्यात आले. विद्यालयामध्ये मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे या हेतूने शासनाने ही योजना सुरू केली असल्याचे पाटील व मिलखे यांनी सांगितले. एसटी प्रवास करताना घ्यावयाची काळजी,रस्ते सुरक्षा,विद्यार्थी पास,अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास योजना,शैक्षणिक सहली याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थी मोफत पास योजनेचे प्रमुख लक्ष्मण दुडे,बाळासाहेब साबळे,देवचंद नेहे, आदी उपस्थित होते.शरद माळवे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.लक्ष्मण दुडे यांनी आभार मानले.