शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

शिरुर तालुक्यातील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती या प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी सुनील भिवाजी थोरात यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. सुनील थोरात यांना यापूर्वी पंचायत समिती व मुख्याध्यापक संघाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहेच याशिवाय पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई ट्रस्ट उरळीकांचन यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय प्रतिभा रत्न गौरव पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांनी इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुका व जिल्हास्तरावर उत्तम प्रकारचे काम केले आहे.

याशिवाय किशोरवयीन मुलांच्या समस्या, वृक्षारोपण, वक्तृत्व, सांस्कृतिक अशा अनेक शालेय व सहशालेय उपक्रमामध्ये सहभाग घेऊन उत्तम कामगिरी पार पाडली आहे त्यांनी यापूर्वी शिक्षक, पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून उत्तम काम पाहिले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button