शिरूर:सुदर्शन दरेकर
पुणे शहरात नुकतेच घडलेले अपघात प्रकारणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली शहरात अल्पवयीन मुले सर्रास वाहन चालवताना दिसत असतात त्यातून अपघात होण्याचे प्रमाण लक्षात घेता शिरूर पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी व चारचाकी गाडी देणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे शिरूरचे पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.शिरूर शहरातील वाहतुकीला पर्याय म्हणून सम विषम तारखेला वर्दळीच्या रस्त्यांवर पार्किंग व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.व्यापारी व छोटे दुकानदार यांना विनंती करून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी व शहरातील शाळा व्यवस्थापन व पालकांना याची सूचना शाळा स्तरावर देण्यात येणार आहे.महाविद्यालयात दामिनी पथकांमार्फत जागृती करण्याचे काम चालू झाले आहे. खाजगी शाळाच्या बसेसची आर.टी.ओ.कडून तपासणी करण्याच्या सूचना व्यस्थापनाला दिल्या आहेत.सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले आहे.