शिरूर प्रतिनिधी सुदर्शन दरेकर

शिरूर शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद निमित्त शहरातील बाजार मज्जिद ,जामा मस्जिद ,मदिना मस्जिद, बकरकसाई मज्जिद , या ठिकाणी नमाज अदा केली .प्रेषित इब्राहिमने देवाला आपला मुलगा दान करण्याची तयारी दर्शवली होती त्याची आठवण म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. पावसासाठी आणि विश्वशांतीसाठी भाईचारा नांदावा यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली.शिरूर शहर परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध समाज बांधवांशी समन्वय ठेवत, सामाजिक सलोखा नांदण्यासाठी प्रयत्नशील राहणारे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे तसेच 4 पोलीस अधिकारी, 25 पोलीस अंमलदार , 21 होमगार्ड, व एक एस आर पी एक पथक, असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रांमध्ये शांतता राहावी व सर्व धर्मीय एकोपा राहण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button