जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे फार्मसी, अभियांत्रिकी,व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या ९ प्राध्यापकांना यावर्षी पीएचडी पदवी प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्रा.सचिन दातखिळे यांनी सनराईज विश्वविद्यालय,अलवर, राजस्थान या विद्यापीठामार्फत “मानवी रक्तामधील फार्मास्यूटिकल औषधांच्या मोजण्यायोग्य इच्छाशक्ती च्या प्रक्रियेचा वाढीचा अभ्यास” या विषयावर प्रबंध सादर केला.डॉ.मृणाल शिरसाट यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.राहुल लोखंडे यांना मोनाड विश्वविद्यालय, हापूर,उत्तर प्रदेश या विद्यापीठामध्ये ऍसिटोफेनाॅनपासून १,५ बेंझोडायझेपाईन डेरिव्हेटिव्हजचे सोयीस्कर संष्लेषण करण्यासाठी प्रस्थापित अल्डीहाईड एक मिरगी विरोधी औषध संशोधन यावर प्रबंध सादर केला.डॉ.अंजुम कुमार शर्मा यांनी मार्गदर्शन केले,प्रा.संतोष पवार यांनी सनराईज विश्वविद्यालय,अलवर,राजस्थान मार्फत संस्थांमधील औदयोगिक संबंधामध्ये मानवी संसाधन विकास सराव पध्दतीवरील कार्यप्रदर्शन मुल्यमापन परिणामांचा प्रायोगिक अभ्यास या विषयावर प्रबंध सादर करत डाॅ.दयानंद सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी प्राप्त केली.प्रा.सचिन भालेकर यांनी सनराइज विश्वविद्यालय अलवर राजस्थान या विद्यापीठांतर्गत चेतासंस्था संबंधातील निदानासाठी संश्लेषण क्लिनिकल बायो क्लीनिकल दृष्टिकोनाचा विकास या विषयावर प्रबंध सादर केला.डॉ.व्यंकटेश अलंकी यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.सागर तांबे यांना मोनाड विश्वविद्यालय हापुर उत्तर प्रदेश या विद्यापीठाअंतर्गत हर्बल अँटी एजिंग सुत्रीकरणेयांचा विकास या विषयावर प्रबंध सादर केला.डॉ.विवेक गुप्ता यांनी त्यांना मार्गदर्शन केले.प्रा.शितल गायकवाड यांनी भगवंत विश्वविद्यालय अजमेर राजस्थान अंतर्गत जैविक स्वारस्य असलेल्या काही नवीन हेट्रोसायकलचे संश्लेषण आणि मूल्यांकन या विषयावर प्रबंध सादर केला.डॉ.रविंद्र लावरे यांनी त्यांना मार्गदर्शक म्हणून काम केले.समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रा.मंगेश होले यांनी जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठ,हैदराबाद,तेलंगणा या विद्यापीठांतर्गत 1,2,3, 4-टेट्राहाइड्रोपायरीमिडीन आणि थायोफेन-2yl -पायरीमिडीनचे ट्यूमर, वेदनाशामक आणि दाहक-विरोधी एजंट म्हणून संश्लेषण आणि मूल्यांकन या विषयावर प्रबंध सादर केला. डॉ.शशिकांत आर.पट्टण यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट या विभागातील प्रा.रुस्तुम दराडे यांनी आरके विद्यापीठ राजकोट गुजरात अंतर्गत सामाजिक उद्योजकतेवर परिणाम करणारा घटक ओळखणे व महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील निवडक ग्रामीण भागाचा अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला डॉ.अल्पेश नसित यांनी गाईड म्हणून काम पाहिले.समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील प्रा.निवृत्ती चौधरी यांनी जे जे टी यु युनिव्हर्सिटी अंतर्गत डी डी ओ एस स्मर्फ अटॅक प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन युजिंग पिकॅप अनालायझर अप्रोच या विषयावर प्रबंध सादर केला.डॉ.समीर शेख यांनी त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सर्व पदवी प्राप्त प्राध्यापकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध असून त्यासाठी गुणवंत शिक्षकांची आवश्यकता असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,एमबीएचे डॉ.शिरीष गवळी,डॉ.महेश भास्कर,सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.