शुभम वाकचौरे
शिरूर तालुक्यामधील पूर्व भागात एका व्यक्तीने दिव्यांग असल्याचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी मिळविली त्याप्रकरणी सबंधित प्रमाणपत्र व ते कोणी दिले त्या अधिकाऱ्याची चौकशी होण्यासाठी कुलथे परिवारातील महिलेने शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना सदर बनावट वैद्यकिय प्रमाणपत्राची सखोल चौकशी व्हावी असे लेखी पत्राद्वारे निवेदन देऊन दि.०९ जून रोजी शिरूर तहसील कार्यालयात उपोषण सुरू केले.
उपोषण दरम्यान विविध सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रिय मानव अधिकार, तसेच हयुमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाच्या टीमने उपस्थित राहून उपोषणास पाठिंबा दर्शवला त्यामुळे शिरूर तहसीलदार यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन उपोषणाच्या चौथ्या दिवशी दिव्यांग तसेच वैद्यकीय बनावट प्रमाणपत्राची सखोल चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालय पुणे, उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई, जिल्हाधिकारी पुणे, शिरूर पोलीस स्टेशन या सर्व कार्यालयात निवेदनाची प्रत पाठवून पुढील चौकशी करून कारवाई करू असे कुलथे यांना आश्वासन देण्यात आले तरी आपण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन उपोषणकर्ते यांना तहसिलदार यांनी केले, त्यानंतर सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुलथे यांनी उपोषण सोडले.
:- वैद्यकीय बनावट प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल :- बाळासाहेब म्हस्के (तहसीलदार शिरूर)