जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्याचा उत्तरेकडील पुष्पावती नदीचे खोरे जे माळशेज म्हणून ओळखले जाते सध्या हे खोरे रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शिंदाडे(शिंदूळ्या) फळांची व त्याच्या झाडांमुळे रानमेवा खाणाऱ्यांना आकर्षित करत आहेत कारण शिंदीचे झाडे शिंदाडांनी लगडलेली आहेत लाल पिवळ्या व केशरी रंगाची ही फळे आयुर्वेदिक मानले जाते.
पुष्पावती च्या दोन्ही किनाऱ्यावर,ओढ्यांच्या काठावर तळ्यांच्या काठावर याशिवाय शेतीच्या बांधावर,डोंगराच्या टेकड्यावर हमखास आढळणारे हे झाड ताड व खजूरवर्गीय असल्याने अगदी सरळसोट आणि गगनचुंबी वाढणारे हे शिंदीचे झाडे सध्या शिंदाडे फळांनी बहरली आहेत ही फळे याभागातील लोकांसाठी “गरिबांचा खजूर ” म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांसाठी हे शिंदीचे हे झाड थेट उपयोगाचे नसले तरी कोकणात नारळाचे झाड जसे कल्पवृक्ष मानले जाते तसे या माळशेज खोऱ्यात शिंदीच्या झाडाला कल्पतरू मानले जाते कारण हे झाड बहुउपयोगी आहे.या झाडाच्या फोकांपासून (फांद्यांपासून)डालगे,टोपल्या तयार केल्या जातात याशिवाय पानांपासून केरसुणी (झाडू )बनविल्या जातात त्यामुळे एका मानवी जमातीला व्यवसाय प्राप्त होऊन आर्थिक मदत होते.
या झाडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या शेंड्याजवळ एक मानवी जमातीने स्वतःचे कसब वापरून कोरीव काम करून मडके लावून शिंदी रस गोळा केला जातो त्यालाच “ताडी” असे म्हणतात याशिवाय गोडशिंदी रसाला “निरा”असे म्हणतात सध्या या दोन्ही गोष्टींचा मोठा व्यवसाय उदयास आला असून ज्यामुळे सरकारला मोठा महसूल देणारा ठरतो आहे.मात्र या व्यवसायांनी शिंदीच्या हजारो झाडांचा बळी जाताना दिसून येत आहे..
एकमात्र खरे आहे सध्या शिंदीच्या झाडांना शिंदुळ्या च्या फळांच्या घडांनी लगडले असून येत्या पंधरा दिवसात गावरान मेवा खजुराच्या रुपात सर्वांना खायला मिळणार एवढे मात्र निश्चित.