प्रतिनिधी : सचिन थोरवे
माळशेज घाटामध्ये दरड कोसळून चुलत्या आणि पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊनच माळशेज घाट मार्गे प्रवास करावा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच माळशेज घाटामध्ये नगर येथील भालेराव कुटुंब रिक्षा क्रमांक एम एच 03- DS- 3211 या वाहनातून मुलुंड पश्चिम मुंबई येथून त्यांच्या मूळ गावी जात असताना माळशेज घाटामध्ये ठाणे जिल्ह्यातील टोकवडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माळशेज घाटात अचानक दरड कोसळली आणि त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी या गावातील एकाच कुटुंबातील राहुल बबन भालेराव वय 30 वर्ष आणि स्वयम सचिन भालेराव वय 07वर्षे दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर कुटुंबातील श्री बबन गोपाळ भालेराव सौ विमल बबन भालेराव त्याचप्रमाणे सचिन बबन भालेराव हे जखमी झाले असून हे त्याच्यातून बचावलेले आहे त्यांना उपचारासाठी पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सरकारी दवाखान्यांमध्ये आणण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्याकडे मिळाली असून मृत व्यक्तींचे पोस्टमार्टम करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
माळशेज घाट परिसरामध्ये पावसाळ्याला पूर्ण सुरुवात झाली नसताना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसातच या ठिकाणी दरडी कोसळायला सुरुवात झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी देखील आता राजकारणाचा आखाडा बाजूला ठेवून महाराष्ट्राचे आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी या घाटातून दररोज अन्नधान्य पुरवण्याच्या दृष्टीने फळ आणि भाज्यांच्या गाड्या त्याचप्रमाणे अनेक नागरिक आपली आर्थिक पोटाची भूक भागवण्यासाठी या मार्गे प्रवास करतात त्यांच्या जीवाला कुठल्याही प्रकारे धोका होऊ नये याची काळजी सरकारने आणि संबंधित विभागाने घ्यावी अन्यथा बेजबाबदार सरकारला आणि अधिकाऱ्यांना जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय शेठ भुजबळ तालुका शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष सचिन थोरवे यांनी इशारा दिला आहे.
सदर व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूची नोंद 00 खाली करण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सदरचे पेपर माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये टोकावडे पोलीस स्टेशन जिल्हा ठाणे येथे वर्ग करण्याची तजवीज ठेवण्यात आल्याची माहिती एपीआय थाटे यांनी दिली आहे.