प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
पुणे शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या कात्रज सर्प उद्यानात संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून वरूणराजाच्या आगमनानंतर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संजीवनी फाउंडेशन पर्यावरण संवर्धनासाठी कायम प्रयत्न करत असून भविष्यातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद पवार यांनी दिली.
आज पर्यावरणदिनाचे औचित्य साधून कात्रजच्या सर्प उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वर साहेब,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शिंदे साहेब,स्नेहा पवार,वैजयंती सहकारी सोसायटी कदम प्लाझाचे चेअरमन विलासराव थिटे,सचिव यशवंतराव पवार,रामदासजी बांदेकर रोहित बांदेकर,हलवेकर,सचिन कोळी व संजीवनी फाउंडेशनचे सर्व सहकारी उपस्थित होते.