जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयlमधील इंग्रजी आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख,जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खाडे यांना नुकताच राजगुरुनगर येथे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान केला गेल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह पंकज घोलप यांनी दिली.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी,माध्यमिक शिक्षिका संघ यांचे विद्यमाने माजी शिक्षक आमदार स्वर्गीय शिवाजीराव बेंडे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजगुरुनगर येथे एका शानदार समारंभात जिल्ह्यातील १६ शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवले गेले. भाऊसाहेब खाडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात आणि संघटने करता केलेल्या कामाबद्दल त्यांची जुन्नर तालुक्यातून या पुरस्कारा– करिता निवड झाली.खाडे गेली एकतीस वर्षे चैतन्य विद्यालयात इंग्रजी आणि इतिहास विषयाचे अध्यापन करत आहेत.जुन्नर तालुका महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचे तालुका समन्वयक म्हणूनही ते गेली २५ वर्षे काम करीत आहेत.एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते.सामाजिक क्षेत्रात सुद्धा ते प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होत असतात. तालुक्यातील प्रसिद्ध सूत्र संचालक-निवेदक म्हणूनही त्यांना ओळखले जाते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते,माजी आमदार पोपटराव गावडे,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार रामभाऊ कांडगे,शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे, टी.डी.एफ. चे राज्याचे कार्याध्यक्ष जी .के. थोरात, कार्यवाह हिरालाल पगडाल, वसंतराव ताकवले, शिवाजीराव कामथे, सचिन दुर्गाडे , पंकज घोलप, प्रदीप गाढवे,तानाजी झेंडे, रमेश ढोमसे, रवींद्र डुंबरे,राजेंद्र सुतार,विजय घोलप,भाऊसाहेब शिंदे,प्रशांत घुले, हनीफ शेख, जगन्नाथ गाढवे,सविता ताजणे, जयश्री चौधरी,मीरा डुंबरे, प्रतीक अकोलकर, अनिल उकिरडे, अजित डांगे, रतिलाल बागुल,पांडुरंग मुंजाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वसंतराव ताकवले तर सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. दिलीप ढमाले यांनी आभार मानले. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.