शिरूर: सुदर्शन दरेकर
नोबेल पारितोषिकविजेते व जगभरातील लहान मुलांच्या शिक्षण,आरोग्य या विषयावर मोठे काम करणारे कैलास सत्यार्थी यांना मानाचा नोबेल पुरस्कार दिला होता, भारतासह अनेक देशात त्यांच्या संस्थेचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.शिरूर तालुक्यातील चाळीस गावात हे काम मोठ्याप्रमाणावर चालू आहे .त्याची माहिती तालुक्यातील सर्व जनतेपर्यंत पोहचावी या उद्देशाने तालुका पत्रकार प्रतिनिधी व संस्थेचे स्वयंसेवक यांचे एकदिवसीय चर्चासत्र शिरूर येथे नुकतेच पार पडले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सतीश धुमाळ,अभिजित आंबेकर, फैजल पठाण फिरोज शिकलकर तेजस फडके,अमृतेश झामरे, सुदर्शन दरेकर यांच्यासह अनेक पत्रकार या चर्चासत्रात सहभागी होते. कैलास सत्यार्थी फाउंडेशन चे पदाधिकारी जिल्हा समन्वयक सुभाष गत खणे .प्रकल्प अधिकारी अमोल राठोड .सहाय्यक प्रकल्प अधिकारी सागर दांडगे,राहुल खरात, मयुरा दळवी ,रूपाली बोर्डे. कम्युनिटी सोशल वर्कर ललिता पोळ ,शुभांगी मैड ,माधुरी कोरेकर ,अनिल कांबळे परमेश्वर साबे ,निंबाजी नरवडे ,आकाश खटाटे, ज्योती पारधी , पुनम नेवसे उज्वला इचके ,ज्ञानेश ब्राह्मणे, अश्विनी संकपाळ, हजर् होते.शिरूर त्यालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन कुपोषित बालक शाळाबाह्य विद्यार्थी यांचा सर्वे करून त्यांना शिक्षणाचे महत्व जागृत करणे,त्यांना मुख्य प्रवाहात घेऊन येणे यासाठी संस्थेचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात जागृती करण्याचे काम शिरूर तालुक्यात करत आहेत.
यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार सतीश धुमाळ यांनी कैलास सत्यार्थी यांच्या कामाचा व त्यांना नोबेल पारितोषक मिळाल्याबद्दल समाजिक जाणीवेतून समाजाच्या विकासासाठी चिल्ड्रेन फाउंडेशनच्या माध्यमातून देशात काम चालू असल्याचे सांगितले. संस्थेचे काम सर्वदूर पोहचवण्यासाठी पत्रकार संघ वेळोवेळी मदत करेल असे सांगितले .