शिरूर प्रतिनिधी – शकील मणियार
श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी,फळ व्यवसायिक,आपल्या एकतारी गायनातून फुले शाहू आंबेडकर यांचे विचार गावोगावी पेरणारे कालकथित सुभाष विष्णू घोडके यांचे चार दिवसापूर्वी दुःखद निधन झाले ०९ /०६/ २०२४ रोजी सकाळी १० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यांचा अंत्यविधी गुरुवारी सकाळी दहा वाजता पार पडला,हस्ती विसर्जन प्रसंगी विश्वनाथ घोडके,अरुण घोडके,सुरज घोडके,सचिन घोडके व त्यांच्या सर्व परिवाराने अनेक मान्यवरांसह वृक्षारोपण केले.
त्यांच्या जलदान विधीच्या कार्यक्रमात राज कुमार साहेब पुणे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,मेजर गोविंद कांबळे पुणे जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी,संतोष मिसाळ संघटक पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी,भागचंद घोडके माजी नगर अध्यक्ष श्रीगोंदा नगरपरिषद,संग्राम घोडके,माजी उपनगर अध्यक्ष नगरसेवक श्रीगोंदा नगरपरिषद, बापू शेठ गोरे गटनेते श्रीगोंदा नगरपरिषद,शहाजी बापू खेतमाळीस नगरसेवक श्रीगोंदा नगरपरिषद,अशोक भाऊ खेंडके नगरसेवक श्रीगोंदा नगरपरिषद,संतोष क्षीरसागर नगरसेवक श्रीगोंदा नगरपरिषद,अंबादास आवटी नगरसेवक श्रीगोंदा नगरपरिषद, निसार बेपारी नगरसेवक श्रीगोंदा नगरपरिषद,हृदय घोडके महाराष्ट्र पोलीस,जीवाजी घोडके ज्येष्ठ नेते,गौतम घोडके ज्येष्ठ नेते,मोटे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थ नगर,मंगेश घोडके ग्रामपंचायत सदस्य पारगाव सुद्रिक,राम घोडके उपसरपंच वलघुड ग्रामपंचायत,अशोक घोडके चेअरमन नवजीवन मागासवर्गीय सोसायटी,रावसाहेब घोडके संविधान प्रचारक ,पत्रकार विजय कांबळे,पत्रकार चंदन घोडके,पत्रकार राजू शेख पत्रकार,सुरज घोडके,चंपालाल घोडके,धरम घोडके,ऍड राम काळे ,राजू ओव्हळ,सतीश ओव्हळ,संतोष ओव्हळ ,युवराज ससाणे,राहुल रायभोळे , आरूण गायकवाड ,अविनाश घोडके, क्रांती मखरे ,आनंद घोडके घोडके,शिवा आप्पा घोडके, गोरख घोडके, बाळासाहेब घोडके, डॉ संतोष घोडके शहरातील व परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुभाष घोडके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केले .शोक सभेचे अध्यक्ष आयु धोंडीबा पर्वती घोडके ज्येष्ठ बौध्दाचार्य भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्हा यांनी कालकथित सुभाष विष्णू घोडके यांच्या आठवणींवर प्रकाश टाकला.तसेच सुभाष घोडके यांच्या पश्चात पत्नी मुलं मुली नातवंड असा मोठा परिवार आहे सिद्धार्थ नगर येथे त्यांनी महापुरुषांच्या आणि संताच्या जीवन चरित्रावर आधारित अभंग आणि प्रबोधन केले अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असायचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आयोजित धम्म यात्रा यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले.