जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर 1
ओतूर पोलीस स्टेशनमध्ये शनिवार दि.:- ०८ जून रोजी खूनकेल्याचा गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील मयत नामे नवाब अहमद शेख वय ७२ वर्षे सध्या रा:-ओतूर ता:- जुन्नर जि.पुणे हे एकटेच ओतूर येथील वडार वस्तीजवळील पानसरे यांचे पडीक बिल्डींगमध्ये राहत होते.मयत नवाब शेख हे ओतूर येथील कांदा मार्केट मध्ये मिळेल ते काम करत होते. दि:- ०८ जून रोजी नवाब शेख हे ते राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत मिळून आले.त्यांचे हनुवटीवर व गळयावर मारहाण झालेली होती,त्यांचा गळा दाबून खून करणेत आलेला होता.त्याबाबत फिर्यादी शादाब नवाब शेख,वय ४२ वर्षे, रा:-निमोण तास,ता: संगमनेर, जि:- अहिल्यानगर यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
मृतक नवाब शेख यांना अज्ञात व्यक्तीने कोणत्या कारणासाठी मारले हे निष्पन्न करून जवळ- पासचे सर्व सीसीटीव्ही तपासण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे ग्रामीण यांनी केल्या. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,स्थानिक गुन्हे शाखा,यांचे तपास पथक व ओतूर पो स्टे चे तपास पथक अशी दोन पथके तयार करून घटनास्थळाकडे येणारे रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली.घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर अनोळखी ०७ इसमांची संशयित हालचाल आढळून आली.
त्याप्रमाणे सदर संशयित इसमांवर लक्ष केंद्रीत करून स्था.गु.शा. व ओतूर पो स्टे कडील पथकांनी गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांची ओळखपटवून आरोपी १) विलास बाबा वाघ वय २० वर्षे, २) प्रकाश बाबा वाघ वय १९ वर्षे, ३) भिमा गणेश हिलम वय २५ वर्षे, तिघेजण रा:-कन्या शाळा जवळ, ओतूर ता:- जुन्नर जि पुणे,यांचेसह इतर चार विधीसंघर्षीत बालक ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्यांनी मृतक नवाब शेख यांचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले व त्यांचेकडे मयत व्यक्तीचे चोरी केलेले दोन मोबाईल मिळून आले आहेत.त्या सर्वांनी कट रचून दरोडा टाकण्याचे उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयास भा.दं.वि. का.क. ३९६, १२० (ब) हे कलम वाढविणेत आलेले आहेत.आरोपी क्र १ ते ३ यांना मा.न्यायालयासमक्ष हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेवून तपास करणेत येत आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, एस.डी.पी.ओ.रविंद्र चौधर,जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,ओतूर पो.स्टे. चे सपोनि लहू थाटे,पोसई अजित पाटील, स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार दिपक साबळे,राजू मोमीण, अतुल डेरे,संदिप वारे,अक्षय नवले,अक्षय सुपे,ओतूर पो स्टे कडील अंमलदार महेश पठारे,देविदास खेडकर, ज्योतीराम पवार, बाळशिराम भवारी,नदीम तडवी, यांनी केली असून पुढील तपास सपोनि लहू थाटे ओतूर पो.स्टे. हे करत आहेत.