जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
संत गोरोबाकाका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बनकरफाटा, ता. जुन्नर या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा या संस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ गणपत उकिर्डे (भाऊसाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिनांक-२७ ऑगस्ट रोजी सकाळी-१०.३० वाजता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व १० विषय उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केले आहेत.
संस्थेच्या कामकाजाविषयी बोलताना सभासदांनी संस्थेच्या कारभाराचे मोठे कौतुक केले.कुंभार समाजाच्या आर्थिक उन्नतीकरीता २०२२ साली स्थापन झालेल्या या संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शकपणे सुरु असून आर्थिक मागासलेल्या समाज बांधवांना गोरोबाकाका पतसंस्था मोठा आधार ठरत असल्याचे सभासदांमधून बोलले जात आहे.
याप्रसंगी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष गोरखनाथ उकिर्डे म्हणाले की,संत परीक्षक गोरोबाकाका यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या या संस्थेस कुंभार समाज बांधवाबरोबरच बहुजन समाजाचाही मोठा प्रतिसाद मिळत असून संस्थेच्या स्वनिधीमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याने जुन्नर तालुक्यातील सर्व कुंभार समाज बांधवांनी संस्थेचे सभासद व्हावे,असे आवाहन उकिर्डे यांनी याप्रसंगी केले आहे.याप्रसंगी अध्यक्ष गोरखनाथ उकिर्डे (भाऊसाहेब),उपाध्यक्ष मिननाथ शिंदे,सचिव आश्र्विनी शिंदे व सर्व संचालक मंडळ सदस्य,सभासद दत्तात्रय हिवरेकर गुरुजी,दामोदर जगदाळे,उमेश शिंदे,विठ्ठल जाधव,विकास हिवरेकर,सागर शिंदे,दिगंबर शिंदे आदिंसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन सचिव आश्र्विनी शिंदे यांनी केले. दत्तात्रय हिवरेकर, उमेश शिंदे, विलास शिंदे, दामोदर जगदाळे, केरभाऊ शिंदे, संतोष शिंदे, सागर शिंदे आदि सभासदांनी चर्चेत सहभाग नोंदविला सभासदांनी केलेल्या सुचनांचे संचालक संतोष सोमवंशी,अनिल विश्वासराव, योगेश जगताप,अमोल भागवत,सुनिल जाधव यांनी स्वागत केले.संचालक अॅड.संजय उकिर्डे यांनी दुःखवट्याचा ठराव मांडला तर उपस्थित सभासदांचे आभार संचालक राजेंद्ग जाधव यांनी मानले.