जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर

प्रसिद्ध बाल साहित्यिक,लेखक,कवी उत्तम सदाकाळ यांच्या ‘ पाऊस ‘ या बालकवितासंग्रहाला “कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान,सातारा यांचे वतीने “राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार 2023” मा.दिप्ती सुर्यवंशी ( उपजिल्हाधिकारी,पुणे) यांचे हस्ते कुपर कॉलनी सांस्कृतिक मंडळ,सदरबझार,सातारा येथे प्रदान करण्यात आला.

उत्तम सदाकाळ यांच्या पाऊस या पुरस्कारप्राप्त बालकवितासंग्रहातील “पाऊस” हि कविता इयत्ता दुसरीच्या पाठयपुस्तकातील अभ्यासक्रमातही समाविष्ट केली गेली आहे.

पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी कादंबरीकार प्रा. डॉ. राजेंद्र माने , प्रा.निरंजन फरांदे. ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे , सावित्री जगदाळे,वीरभद्र मिरेवाड,बबन शिंदे,कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे संस्थापक हणमंतराव जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button