जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उदापुर ता:-जुन्नर येथील ग्रामविकास मंडळ,ओतूर संचलित सरस्वती विद्यालयाचा इयत्ता दहावीचा मार्च २०२४ चा निकाल सेमी इंग्रजी माध्यम १००% तर मराठी माध्यमाचा ९६:०७ % लागला असून सर्व विद्यार्थी व पालक व शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पुढील मार्च २०२५ इयत्ता दहावीच्या बॅच मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सरस्वती विद्यालयात मार्च २०२४ इयत्ता दहावी च्या परीक्षेस एकूण सेमी व मराठी माध्यम एकूण ८५ विद्यार्थी पात्र झाले होते व ८३ विध्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शेकडा १००% लागला आहे.यामध्ये विशेष श्रेणी ३४ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ३० विध्यार्थी,तर द्वितीय श्रेणी १९ विद्यार्थी अशा पद्धतीने उत्तीर्ण झाले असून मराठी माध्यमाच्या दोन विद्यार्थ्यांनी नापास झाल्याने या मराठी माध्यमाचा निकाल शेकडा ९६:०७ % लागला आहे.
:-सरस्वती विद्यालयाचे ०६ प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी:-
१)ऋतुजा रविंद्र भोर :-९५:२०%
२)कीर्ती गणेश बटवाल:- ९४: ६०%
३)सृष्टी एकनाथ अमूप:- ९३: ६०%
४)श्रद्धा प्रकाश चौधरी:- ९३:२०%
५)श्रद्धा संजय अमूप :- ९१:४०%
६)श्राव्या कैलास बनकर:-९१%
यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षिका यांचे ग्रामविकास मंडळ,ओतूर,ग्रामविकास मंडळ उदापुर,श्रीराम देवस्थान ट्रस्ट, उदापुर,सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत उदापुर तसेच शालेय व्यवस्थापन समिती महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष उदापुर,सह्याद्री गणेश मित्र मंडळ व सर्व गणेश मंडळे,नवरात्रोउत्सव मंडळ सर्व पतसंस्था व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व व्हाईसचेअरमन आणि उदापुर ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.