जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
श्री क्षेत्र लेण्याद्री ता:- जुन्नर येथे रविवारी ता:-२६। मे रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीं'च्या दर्शना घेण्याकरिता भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. अष्टविनायक 'श्री गिरीजात्मज' गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.भाविकांच्या गर्दीमुळे लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस आणि गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती.श्री लेण्याद्री गणपती देवस्थानच्या वतीने अध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. देवाच्या नैवेद्याकरीता संदीप बोचरे आणि सुधीर भगत यांनी आंबे दिले. मंदिरात सकाळी ६, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली.यावेळी अविराज वाघोले, राहुल पठाडे,अमोल भुजबळ,जितेंद्र बनकर, प्रवीण कोमटे यांच्या हस्ते विधीवत अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
भाविकांना सुलभ दर्शनासाठी गर्दीचे नियोजन केले होते.यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष,माजी अध्यक्ष जितेंद्र बिडवई, गोविंद मेहेर,सेक्रेटरी शंकर ताम्हाणे,खजिनदार भगवान हांडे,विश्वस्त प्रभाकर जाधव,मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे,विजय वऱ्हाडी,नंदकुमार बिडवई, जयवंत डोके,कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई,व्यवस्थापक नीलेश सरजिने उपस्थित होते.सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळाचे संगीत भजन झाले.चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली.त्यानंतर नारायणगाव येथील सिद्धेश पारधी यांचे वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.