शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
कारेगाव येथील कारेश्वर शिक्षण संस्थेचे कारेश्वर इंग्लिश मेडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कु.कशिश अशोक शिंदे हिने शिरूर तालुक्यात वाणिज्य शाखेमध्ये १२वीच्या परीक्षेत ९२% टक्के गुण मिळवून शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल कारेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, चेअरमन संग्राम शेवाळे, प्राचार्य स्नेहलता यादव यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.यावर्षी झालेल्या १२ वीच्या परीक्षेत कारेश्विवर विद्यालयात विज्ञान शाखेत घाडगे जयराज ८८% टक्के प्रथम, भाले खुशी ७८% टक्के दुसरा, पावसे श्रीराज ७६% टक्के, सोनवणे सुरभी ७६% टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तर वाणिज्य शाखेत शिंदे कशिष अशोक ९२% टक्के प्रथम, काळे वैष्णवी रमेश ८८% टक्के ,आग्रे ओम श्रीराम ८६% टक्के या विद्यार्थांनी बाजी मारली.
या यशस्वी विद्यार्थांना कारेश्वर विद्यालयातील संचालक शुभम यादव,वैभव मालभारे सर,अर्चना घोडके मॅडम ,पुष्कर रुणवाल सर, अजित कटके सर,तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कारेश्वर जुनियर कॉलेज हे उत्कृष्ट शिक्षणाची परंपरा जोपासत विद्यार्थांचे भवितव्य घडवत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थांना आतिशय मुबलक दारात शिक्षण देऊन विद्यार्थांचा व्यक्तिमत्व विकास व बौद्धिक विकास या संस्थेद्वारे करत आहे. १२ वीच्या परीक्षेत उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे संस्थेचे संथापक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.