जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर

जुन्नर वनसंरक्षण विभागातील जुन्नर,आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस मानव बिबट संघर्ष वाढत असून हा संघर्ष कमी होण्यासाठी आणि या संघर्षातून मार्ग काढत असताना वनकर्मचाऱ्यांना अनेक जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते तरीही संयम राखत वनविभागाच्यावतीने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी शनिवार दि:-२५ मे रोजी बिबट निवारा केंद्र माणिकडोह येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जुन्नर वनविभागाच्यावतीने माणिकडोह येथे मानव व बिबट संघर्ष यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेम अमोल सातपुते बोलत होते यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे,संदेश पाटील, जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाणओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल सातपुते म्हणाले, वनविभागावर अनेकांनी बेछुट व निराधार आरोप केले आहेत त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद मुळीच नाही तर मानव व बिबट संघर्ष कसा कमी करता येईल त्यासाठी वनविभागाच्यावतीने कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याची माहिती सामान्य शेतकऱ्यांना व जनतेला व्हावी यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली आहे.बिबट्यांचे मानवावरील हल्ल्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. मात्र वनविभाग पूर्णपणे सक्रीय असून विभागाचे सर्वच अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत.जुन्नर , आंबेगाव व शिरूर या तालुक्याती पाच ते सहा व्हॉट स्पॉट आहेत तिथे बिबटे जास्त असून वनविभाग अशा ठिकाणी तातडीने पिंजरा लावून बिबट्या पकडण्याचे काम करत आहे.याशिवाय घटना घडली ते ठिकाण व सर्व जनमानसात जनजागृती करून बचावपथकाची स्थापना करण्यात आली आहे. बिबट कृती दल बेस कैंप स्थापन करणे, कंट्रोल रूम, बिबट्यांच्या प्रजनन क्षमतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावर नसबंदी करण्याबाबतचा प्रस्तावदेखील शासनाकडे पाठविला आहे.मात्र हा देशातील पहिलाच प्रस्ताव असल्याने पूर्ण अभ्यासपूर्ण असा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे

माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ४० बिबटे ठेवण्याची क्षमता असून येथील निवारा केंद्राशेजारीच जलसंपदा(इरिगेशन) विभागाची १२.५ हेक्टर क्षेत्र लवकरच वनविभागाला मिळणार असून त्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथे बिबट निवारा केंद्राचे साधारणतः एक वर्षात या जागेचा विकास करून विस्तारीकरण करण्यात येणार असून विस्तारीकरणानंतर येथे आणखी ६० बिबटे ठेवता येतील म्हणजे पुढे भविष्यात निवारा केंद्रात एकूण १०० बिबटे सांभाळणे शक्य होईलआणखी असे अमोल सातपुते यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी अनेक प्रश्न विचारले यावेळी पिंपळवंडी,काळवाडी आणि पिंपरीपेंढार येथील बिबट हल्ला व पकडलेल्या बिबट्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना सातपुते म्हणाले की या सर्व घटना दुर्दैवी आहेत आमचे वनविभागाने त्यांच्या कुटुंबाप्रति सोबत असल्याचे सांगितले व या घटनेतील पकडलेले एकूण बिबटे सुरक्षेच्या दृष्टीने गुजरातमध्ये जामनगर येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात येतील सध्या हे सर्व बिबटे माणिकडोह येथील निवारा केंद्रात सुरक्षित आहे त.

या शिवाय या घटनांच्या संदर्भात काही लोकांवर वनविभागाने गुन्हे दाखल केले आहेत हे चुकीचे असून हे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि अमोल सातपुते यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे म्हणून माजी आमदार शरद सोनवणे यांनी आळेफाटा येथे उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात प्रश्न विचारले असता सातपुते यांनी पिंपरीपेंढार येथील हल्ल्यात जायबंदी झालेल्या व आजही वाचा प्राप्त न झालेल्या वनरक्षक सुवर्णा खुटेकर यांना समक्ष हजर केले आणि पत्रकारांना प्रतिप्रश्न केला की या घटनेत वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी यांची काय चूक शेवटी आम्ही सुद्धा तुमच्यातलेच एक आहोत आमच्यावर देखील आमच्या कुटुंबाची जबाबदारी असते.आम्ही संयम ठेवत सामोरे जातो.

दरम्यान आम्ही माजी आमदार शरद सोनवणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल मात्र गुन्हे मागे घेण्याचे माझ्या हातात नाही.आमच्यात कोणत्याही प्रकारचे क्लेश नाहीत आणि प्रसार माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने बातम्यांचा प्रसार न करता जनतेत भ्रम निर्माण करू नये अशा यू ट्यूब चॅनेल्स विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.वनविभाग सदैव प्रत्येक घटनेतसतर्क आहेत सर्वांनी सहकार्य केल्यास मानव बिबट संघर्ष निश्चितच कमी होईल भविष्यात आम्ही जनतेच्या मदतीने हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मात्र कायदा कोणीही हातात घेऊ नये.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button