जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर 1
पारनेर तालुक्यात साहित्य क्षेत्रात आजवर अनेकांनी आपले योगदान दिले.त्यातील काही साहित्यिक राज्य स्तरावर गाजले.त्यातल्या त्यात युवक वर्गातून देवा झिंजाड यांचे नाव सातत्याने साहित्य क्षेत्रात राज्य आणि देशपातळीवर गाजत आहे.त्यांच्या ‘एक भाकर तीन चुली’ या कादंबरीला चार महिन्यांत दहा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथील देवा झिंजाड यांनी वक्तृत्व व कवितेच्या माध्यमातून मोठी ओळख निर्माण केली.साहित्य क्षेत्रात त्यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कविता संग्रहाने अनेक मानाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार पटकावले आहेत.आजवर त्यांच्या कविता संग्रहाला पंधराहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या देश-विदेशांतही प्रचंड गाजत असलेली ४२५ पानांची कादंबरी सुद्धा वाचकांच्या पसंतीस उतरत आहे.ही कादंबरी म्हणजे ‘एक भाकर तीन चुली’ होय. या कादंबरीच्या चार महिन्यांत चार आवृत्त्या प्रकाशित तर झाल्याच आहेत.शिवाय १० राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारसुद्धा जाहीर झाले आहेत.
या कादंबरीवर अनेकांनी उत्तम समीक्षण लिहिले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून मिळवलेले हे साहित्यिक यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.आपल्याच तालुक्यातल्या एका मुलाचे हे यश पाहून अनेक नवीन हात लिहू लागले आहेत,ही जमेची बाजू आहे. २६ मे – रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते त्यांना मसाप (पुणे) येथे सन्मानित करण्यात येणार आहे.शिवाबाबा प्रतिष्ठान तर्फे ४ जून रोजी शिर्डी येथेही त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
:- वास्तववादी लिखाण-:देवा झिंजाड यांची ‘एक भाकर तीन चुली’ ही कादंबरी सध्या प्रचंड गाजत आहे. अस्सल ग्रामीण बाजाचे वास्तववादी लिखाण असल्याने सर्वच वयोगटातल्या वाचकांना ही कादंबरी आकर्षित करीत आहे.या कादंबरीवर शेकडो जणांनी समीक्षण लिहिले आहे. गाव खेड्यातून विस्थापित झालेल्या अनेक माणसांना ही कादंबरी विशेष आवडत आहे.एका स्त्रीचा जिद्दीचा व चिकाटीच्या संघर्षांचा हा लेखाजोखा आहे.
देवा झिंजाड हे जरी पारनेर तालुक्यातील असले तरी ते जुन्नर तालुक्यातील अत्यंत क्रियाशील असंणारा एक व्हाट्सएप ग्रुप जो बोर्डरलेस पँथर्स नावाने प्रसिध्द असून या ग्रुपचे सदस्य आहेत या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असणारे सदस्य हे संपूर्ण भारत आणि देश विदेशात राहून ग्रूप सदस्यांच्या सुख दुःखात सहकार्य करतात त्यामुळे देवा झिंजाड यांचे कादंबरीला जे अनेक पुरस्कार मिळाले आहेत हे समजताच या ग्रुपच्या हजारो मित्र/ मैत्रिणीनी त्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.